‘उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?’

मुंबई – दहशतवादी याकूब मेमनच्या (Terrorist Yakub Memon) कबरीचं सुशोभीकरण करून त्यावर रोषणाई करण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या गंभीर प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरु झाले आहे. भाजप आणि शिंदे गट (BJP and Shinde group) महाविकास आघाडीवर अक्षरशः तुटून पडला आहे तर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) देखील या आरोपांना आणि टीकेला प्रत्युत्तर देत आहे.

आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ट्विट करत जोरदार निशाणा साधाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडवल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

 

नेमकं काय म्हटलंय भातखळकर यांनी?

”मुख्यमंत्री जनाब उध्दव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते. उध्दव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले?” असं ट्विट त्यांनी केलं आहे.