यूपीत भाजप तब्बल 100 जागांवर पुढे, जाणून घ्या इतर राज्यातील स्थिती

नवी दिल्ली – उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंडसह 5 राज्यांमध्ये सर्व विधानसभा जागांसाठी सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली. यूपीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. पहिल्या 26 मिनिटांत यूपीच्या ट्रेंडमध्ये भाजपने 100 जागांचा आकडा गाठला. ट्रेंडमध्ये समाजवादी पक्ष 50 जागांवर पुढे आहे. बसपा 3 आणि काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे.

उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत आहे. पहिल्या अर्ध्या तासात दोन्ही पक्ष 27-27 जागांवर आघाडीवर होते. त्याचबरोबर पंजाबच्या ट्रेंडमध्ये आम आदमी पार्टी 28 जागांवर तर काँग्रेस 18 जागांवर आघाडीवर आहे.

दरम्यान, युपी मध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव करहल विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. नोएडामधून भाजपचे उमेदवार पंकज सिंह आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री सिद्धार्थनाथ सिंह अलाहाबाद मतदारसंघातून पिछाडीवर आहेत.