भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारांची घोषणा; पहा कुणाची लागली वर्णी

नवी दिल्ली- विधानपरिषद निवडणुकीसाठी (MLC election) भाजपने आपल्या चार उमेदरवांची नावे निश्चित (BJP decide four names for MLC Vidhan Parishad Election) केली असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपने विधानपरिषद निवडणुकीसाठी आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवीण दरेकर (Pravin Darekar), राम शिंदे (Ram Shinde), प्रसाद लाड (Prasad Lad) आणि श्रीकांत भारतीय यांच्यासह उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात विधानपरिषदेतून सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांच्यासह सुभाष देसाई(subhash desai), दिवाकर रावते(diwakar Rawate), (शिवसेना) प्रवीण दरेकर(Pravin darekar), सदाभाऊ खोत(sadabhau khot), प्रसाद लाड(Prasad lad), विनायक मेटे(Vinayak mete), सुजितसिंह ठाकूर, स्व. आर. एस. सिंह, (Sujit Singh Thakur, late. R. S. sinh) (सर्व भाजप) संजय दौंड(sanjay duand) (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहेत.

भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांचा पत्ता पुन्हा एकदा कट करण्यात आल्याचे यात दिसून येत आहे.  दरम्यान, भाजपने पाचवा उमेदवार दिल्याने आता राज्यसभे पाठोपाठ विधानपरिषदेची सुद्धा निवडणूक होऊ शकते. दरम्यान, शिवसेनेकडून विधानपरिषदेच्या दोन जागांसाठी सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी यांच्या नावांची घोषणा केली आहे.