विधान परिषदेच्या मुंबई महानगरपालिका मतदारसंघातून भाजपतर्फे राजहंस सिंग यांची उमेदवारी घोषित

मुंबई – राजहंस सिंग हे सर्वप्रथम 1992 मध्ये मुंबई पालिकेच्या नगरसेवक पदी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत.वर्ष 1992 ते 1997 ते नगरसेवक होते. नंतर दोन वर्ष 2002 पासून 2012 पर्यंत सलग बारा वर्षे नगरसेवक होते. या कालावधीत वर्ष 2004 पासून वर्ष 2012 पर्यंत सलग आठ वर्ष विरोधी पक्ष नेता पदी होते.

याच दरम्यान वर्ष 2009 मध्ये दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आलेत.
2009 ते 2014 ते विधानसभा सदस्य ही होते.वर्ष 2017 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आज पर्यंत मुंबई भारतीय जनता पक्षाचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

मुंबई भारतीय जनता पक्ष आयोजित मुंबईतील चौपाल कार्यक्रमात त्यांची भूमिका अग्रेसर राहिली आहे. रूबाबदार व्यक्तिमत्व, मराठी भाषेवरिल प्रभुत्व आणि जोरकस भाषण शैली अत्यंत कुशाग्र बुद्धी प्रामाणिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे. मुंबई पालिकेच्या इतिहासात या मतदार संघातून निवडून जाणाऱ्या उमेदवारांपैकी राजहंस सिंग हे मुंबई महापालिकेत तब्बल पंधरा वर्ष नगरसेवक राहिलेले असे पहिलेच उमेदवार असावेत.

म्हणूनच मुंबई भाजपच्या नगरसेवक गटातर्फे त्यांच्या उमेदवारीचे स्वागत करीत त्यांचे जुने सहकारी आणि आत्ताचे भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आणि नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

https://youtu.be/FkhUTw1OjTM

Previous Post

पडद्यामागचे सूत्रधार : भारताच्या ‘आय.एन.एस. विक्रांत’ला कोणी वाचवलं असेल तर ती होती सेहमत खान

Next Post

महेश मांजरेकरांवर पुन्हा नेटकरी चिडले

Related Posts

#factcheck : केंद्र सरकार सर्व विद्यार्थ्यांना लॅपटॉप मोफत देत आहे का?

पुणे – सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सरकार पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप…
Read More
Eknath Shinde - Uddhav Thackeray

माझ्याकडे सगळा हिशोब, बोलायला भाग पाडू नका; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इशारा

Mumbai – माझ्याकडे सगळा हिशोब आहे, बोलायला भाग पाडू नका, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव…
Read More
MSRTC

बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत; पुणे विभागातील ३ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

पुणे  : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात…
Read More