Rahul Gandhi | महाराष्ट्रातील मविआचे सरकार दोन-तीन अरबपतींची मदत करण्यासाठी भाजपाने चोरी करुन, पैसे देऊन पाडले. धारावीची एक लाख कोटी रुपयांची गरिबांची जमीन तुमच्या डोळ्यादेखत बळकावून एका अरबपतीला दिली जात आहे. महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात पळवले आणि त्यातून ५ लाख रोजगार गेले. आयफोन कंपनी, टाटा एअरबस प्रकल्प, वेदांता फॉक्सकॉन गुजरातला पळवले. आता तुमच्यासाठी काम करणारे सरकार निवडून द्या, असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. वांद्रे कुर्ला संकुलातील महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमानी सभेत ते बोलत होते.
पुढे ते म्हणाले, महाराष्ट्रातील सरकार महिलांना पैसे देण्याची घोषणा करत आहे पण दुसरीकडे पेट्रोल, डिझेल, गॅससह सर्व वस्तुंची महागाई झाली आहे. या महागाईतून भाजपा सरकार प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून ९० हजार रुपये काढून घेते व अदानीसारख्या अरबपतींना देत आहे. अदानी अंबानी रोजगार देऊ शकत नाहीत, रोजगार लघु मध्यम व्यापारी देतात पण भाजपा सरकारने हे उद्योगच बंद केले. जीएसटी, नोटबंदी हे छोट्या व्यापाऱ्यांना मारणारे शस्त्र आहे. असे राहुल गांधी म्हणाले.
या सभेला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अविनाश पांडे, मुकुल वासनिक, समाजवादी पक्षाचे नेते अबु आझमी यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
महायुतीचा प्रचार न करणाऱ्यांवर कारवाई होणार! चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा
विधानसभा निवडणुकीत महिला गेम चेंजर ठरणार – भाजप नेते Praveen Darekar