BJP committee meeting | आज दिल्लीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठा निर्णय होणार

आज महाराष्ट्र भाजप कोअर कमिटीची दिल्लीत बैठक (BJP committee meeting) होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या निवडक नेत्यांची बैठक दिल्लीत बोलविली आहे. कोअर कमिटीच्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित राहतील.

दरम्यान, भाजपच्या आजच्या बैठकीत (BJP committee meeting) दोन मोठे निर्णय होणार असल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे भाजपमध्ये फेरबदल करण्यात येण्याची शक्यता आहे. पक्ष संघटनेत अनेक फेरबदल केले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच नव्या चेहऱ्यांना आणि मूळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यांनी पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे बैठकीतील या दोन महत्त्वाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like