भाजपाला पाच हजार वर्षांचा इतिहास आहे : चंद्रकांत पाटील

पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant patil) यांनी भाजप हा काही १९५१ मध्ये स्थापन झालेला पक्ष नाही त्याला पाच हजार वर्षांचा इतिहास(History)  आहे असं म्हटलं. पुण्यात ‘भाजपा : काल आज आणि उद्या’ या ग्रंथ प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी हिंदुत्त्वाचा संदर्भ देत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या हस्ते पुण्यात एका ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी कार्यक्रमात बोलताना चंद्रकात पाटील यांनी हा दावा केलाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपबद्दल किती अज्ञान असावे. भाजपाला ५ वर्षांच्या हिंदुत्वाचा इतिहास (History of Hindutva) आहे. भाजपाला मोठा वसा आहे. या पक्षाला हात लावता येणार नाही याची कल्पना आहे. अशावेळी हा ग्रंथ प्रकाशित झाला हे महत्त्वाचं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचं आहे. आम्ही १९५१मध्ये स्थापन झालेलो नाही, तसेच फक्त १९२५मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रेरणा घेत स्थापन झालो नाही तर आमची परंपरा पाच हजार वर्षांपूर्वीची आहे, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

ज्यांना आम्ही पार्टी मोठी केली, गावोगावी नेली, आमच्यामुळे पार्टी मोठी झाली असं वाटण्याच्या स्थितीत हे पुस्तक प्रकाशित होतं आहे. त्यांना इतिहास माहिती नाही असं नाही. पण एक नवीन सिस्टीम तयार झालीय. एकाने सकाळी खोटं बोललं की मग दिवसभर त्याने तेच बोलायचं त्याला इकोसिस्टीम म्हणतात. मग ही इकोसिस्टीम अशी चालते की ते खोटं खरं वाटू लागतं, असा टोला पाटील यांनी भाषणादरम्यान लगावलाय.