राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपाकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम – Nana Patole

राज्यात पुन्हा कंत्राटी भरती सुरु करून भाजपाकडून तरुणांच्या स्वप्नावर नांगर फिरवण्याचे काम - Nana Patole

राज्यात जवळपास २.५ लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागातील मागासवर्गिय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्रीपद ही रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा कंत्राटी भरती सुरु करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे. काँग्रेस पक्षाचा कंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रीया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. याप्रश्नी काँग्रेस पक्ष नेहमीच तरुण मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे. यापूर्वी भाजपा युती सरकारने सुरु केलेल्या कंत्राटी पद्धतीच्या नोकर भरतीला तीव्र विरोध केला होता. मागील सरकारमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी भरती करणार नाही असे जाहीर करून ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द केला होता. यानंतरही आरोग्य विभाग व एमपीएससीच्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने लिपीक व टंकलेखक भरण्यास सरकारने परवानगी दिली होती. भारतीय जनता पक्षाच्या करनी व कथनीत फरक असतो. आताही अमरावती जिल्हा सत्र न्यायालय व एस. टी. महामंडळ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्यासाठी जाहिरात दिली आहे. भाजपा युती सरकारच्या काळात तहसीलदार व नायब तहसीलदार पदाचीही कंत्राटी भरती करण्याची जाहिरात प्रसिद्ध केली होती. विशेष म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याची कंत्राटे भाजपाच्याच बगलबच्च्यांच्या कंपनीला दिली जातात. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीने नोकर भरतीचे आश्वासनही दिले होते त्याचा भाजपाला विसर पडलेला दिसत आहे. राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही.

निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापनाही झालेली नाही तरी लगेच एस. टी. महामंडळाने तिकटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे. भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला २१०० रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देतील, असे वाटत नाही असेही नाना पटोले म्हणाले.

Previous Post
अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी, आमदार रासने पहाटेच पोहचले नागरिकांच्या दारात

अनियमित पाणी पुरवठ्याची तक्रारी, आमदार रासने पहाटेच पोहचले नागरिकांच्या दारात

Next Post
अंबानी फक्त दिखाव्यासाठी! हार्दिक पांड्याने लिलावात बनवला होता मुंबईचा संघ | Hardik Pandya

अंबानी फक्त दिखाव्यासाठी! हार्दिक पांड्याने लिलावात बनवला होता मुंबईचा संघ | Hardik Pandya

Related Posts
ajit pawar

कर्नाटक सरकारच्या दडपशाही विरोधात विधानसभेत अजितदादांचा आवाज…

नागपूर   – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन…
Read More
कधीच आई होऊ शकत नाही लोकप्रिय गायिका, या कारणामुळे स्वत:चे मूल जन्माला घालण्यात येतोय अडसर | Selena Gomez

कधीच आई होऊ शकत नाही लोकप्रिय गायिका, या कारणामुळे स्वत:चे मूल जन्माला घालण्यात येतोय अडसर

अमेरिकन गायिका, अभिनेत्री, निर्माती आणि बिझनेसवुमन सेलेना गोमेझ (Selena Gomez) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आता तिने…
Read More
PATOLE, JAYANT PATIL , UDDHAV THACKERAY

आमदार फुटले की पाठवले ? महाविकास आघाडीत संशयाचं वातावरण

मुंबई  – महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारवर (MVA) राजकीय संकटाचे ढग दाटले आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते…
Read More