‘नाना पटोले म्हणजे पिसाळलेला कुत्रा…’, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान

पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात करण्यात आल्या नंतर आपण मोदी नावाच्या गावगुंडाला बोललो असल्याचे स्पष्टीकरण दिले.तरीदेखील हा वाद काही मिटताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी नाशिक मध्ये ‘ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी म्हणतात’ असे वादग्रस्त विधान केले आहे. यावरून आता भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मात्र टीका करताना जगदीश मुळीक यांनी वापरलेल्या शब्दांवरून पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘नाना पटोले म्हणजे पिसाळलेला कुत्रा… बऱ्याच वेळा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे दुर्लक्ष करावे असे म्हणतात पण जर कुत्रा पिसाळलाच तर दांडक्या शिवाय पर्याय नाही. नाना तुम्हाला कार्यकर्ते योग्य धडा शिकवतील…’ या आशयाचे ट्विट जगदीश मुळीक यांनी केले आहे. जगदीश मुळीक यांनी वापरलेल्या भाषेवरून नवा वाद सुरु झाला आहे.

काय आहे प्रकरण ?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बद्दलचे एक बेताल वक्तव्य समोर आले होते. या व्हिडीओमध्ये ते मारण्याची आणि शिव्या देण्याची भाषा करत असल्याचं पाहायला मिळते. आता पटोले यांचा हाच व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये पटोले नेमकं काय म्हणाले?

“मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. दरम्यान, या व्हिडीओची ‘आझाद मराठी’ पुष्टी करत नाही.