शरद पवारचं महाराष्ट्राचा विकास करू शकतात असं सांगत भाजपच्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

सांगली – शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत हजारोंच्या संख्येत शिवाजीराव नाईक (Shivajirao Naik)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर शिवाजीराव नाईक यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाचं कौतूक केलं. केवळ शरद पवारचं महाराष्ट्राचा विकास करू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.

ते म्हणाले, आजच्या शुभदिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा होतोय हा शुभचिन्ह आहे.शरद पवार यांच्या डोळ्यासमोर संपूर्ण महाराष्ट्र आहे, आमच्या या भागातील सर्व गावांतील खडा अन् खडा माहीत आहे. या तालुक्यातून जो शरद पवार यांचा विचार जाईल तो संपूर्ण राज्यभर पसरेल.

शरद पवार यांचे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या कामावर बारीक लक्ष असतं. आमच्या भागात नोकऱ्यांचा प्रश्न आहे, चांदोली धरणाचा पर्यटन विभागाकडून विकास झाला तर विकास होईल. चांदोलीला एक सर्प उद्यान काढा, मत्स्यालय उभा करा इथं नोकरीचा प्रश्न सुटेल. राज्याचा विकास केवळ शरद पवार साहेब करू शकतात,अस शिवाजीराव नाईक यांनी म्हटलं आहे.