भाजप नेत्याचा अपघातात मृत्यू; कुटुंबीयांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

बरेली – आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचे निकटवर्तीय आदित्य मिश्रा (aditya mishra died in a road accident) यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.  मिश्रा यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मिश्रा यांच्या मृत्यूचे सत्य समोर यावे यासाठी कुटुंबीयांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

महंत नरेंद्र गिरी यांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात आत्महत्या केली होती (Narendra Giri committed suicide in september last year). आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी भाजप नेते आदित्य मिश्रा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. नरेंद्र गिरी यांनी आदित्य मिश्रा यांना प्रयागराज येथील हनुमान मंदिराजवळ एक दुकान घेऊन दिले होते. त्या दोघांमध्ये पैशांची देवाण घेवाण चालायची. यावरून दोघांमध्ये वाद देखील झाला होता. यानंतर नरेंद्र गिरी यांनी मिश्रा यांना आपले दुकान रिकामे करण्यास सांगितले.

कुटुंबियांच्या म्हणण्याप्रमाणे मिश्रा हे आपल्या चारचाकीने एका लग्नाच्या वरातीसाठी प्रयागराज येथून देहरादून येथे गेले होते. बुधवारी दुपारी ते देहरादून येथून प्रयागराजला येण्यासाठी रवाना झाले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा हर्ष, मित्र गणक तिवारी आणि अजून एक मित्र होता. यावेळी मिश्रा हे सोबत आपला चालक घेऊन गेले नव्हते. कुटुंबियांना रात्री उशिरा समजले की मिश्रा यांच्या गाडीला बरेली जवळ अपघात झाला. या अपघातात आदित्य मिश्रा आणि त्यांचे मित्र अशोक पांडे यांचा मृत्यू झाला.

मिश्रा हे अनेक विभागांमध्ये कंत्राटदार होते. नरेंद्र गिरी यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आदित्य मिश्रा यांच्या नावाचा उल्लेख केला होता. नरेंद्र गिरी यांचे मिश्रा यांच्याकडून २५ लाख रुपये येणे बाकी होते. गिरी यांच्या मृत्यनंतर देखील मिश्रा यांचे हनुमान मंदिर व मठात ये-जा असायची. यासंदर्भांत आता मिश्रा यांचे कुटुंबीय मृत्यूसंदर्भात उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत आहेत. त्यामुळे आता बरेली पोलिसांच्या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.