निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात – निलेश राणे

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होताना पाहायला मिळत आहे. देशात मुस्लीम आणि ख्रिश्चन समाजाबाबत चिंता वाटावी असं चित्र आहे, असं शरद पवार एका कार्यक्रमात म्हणाले. त्यावरून आता भाजपा नेते निलेश राणे यांनी शरद पवारांची थेट औरंगजेबाशीच तुलना करणारं ट्वीट केलं आहे.

दरम्यान, आता एका वृत्तवाहिनीच्या व्हिडीओचा स्क्रीनशॉट शेअर करून त्यावर निलेश राणेंनी (Nilesh Rane) शरद पवारांना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. “निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लीम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधीकधी वाटतं, औरंगजेबाचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार”, असं या ट्वीटमध्ये शरद पवार म्हणाले आहेत.