‘बच्चूभाऊ जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा पगार ४० हजार करा, नाहीतर हा घ्या राजीनामा’

bacchu kadu - sadabhau khot

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी घोषणा करतानाच एसटी कर्मचाऱ्यांना संप (ST Workers Strike) मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, राज्यातील जवळपास 90 हजारपैकी 73 हजार एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून एस.टी (ST Strike) कर्मचारी राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. आझाद मैदानातील आंदोलनातुम भाजपनेते गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली असली तरी भाजपचा एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठींबा आहे. अशात आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने लढायला महाविकास आघाडी सरकारमधीलच एक मंत्री समोर आला आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार अत्यंत कमी असल्याचे कबुल करत वेळ येईल तेव्हा त्यांच्यासाठी आंदोलन करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. मंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला 40 हजार पगार मिळतो. पण जो एसटी कर्मचारी हजारो लोकांना घेऊन प्रवास करतो, त्याला फक्त 12 हजार पगार मिळत असेल तर ते चुकीचं आहे. आम्ही त्यांच्या बाजूने आहोत. पण आंदोलन करण्याची ही वेळ नाही. आंदोलन माघे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही त्यांच्यासाठी आंदोलन करू, असं बच्चू कडू म्हणाले आहे.

यावर आता भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांना टोला लगावला आहे. ‘४० एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यावर बच्चु कडू साहेबांना काय चुक काय बरोबर ते कळले.. मंत्री आहात ना, मग जा मुख्यमंत्र्यांकडे आणि सांगा त्यांना.. एक तर माझ्या ड्रायव्हरचा पगार १२००० करा नाहीतर एसटी कर्मचाऱ्यांचा ४०.००० करा, नाहीतर हा घ्या राजीनामा..!!’ असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

हे देखील पहा 

https://www.youtube.com/watch?v=FkhUTw1OjTM&t=1s

Previous Post

सोलापूर जिल्ह्यात ‘या’ योजनेचा झाला तब्बल 57 हजार 80 रुग्णांना झाला लाभ

Next Post

नेपाळ, नेदरलँड्स सरकारनं अफ्रिका खंडातून येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंदी

Related Posts
aaditya thackeray

पळालेल्या आमदारांनी डोळ्यात डोळे घालून पाहण्याची हिंमत केली नाही – आदित्य ठाकरे

Mumbai – महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. (Rahul Narvekar finally becomes the Speaker…
Read More
वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही, केशव उपाध्ये यांची टीका

वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांवरील बहिष्कार ही घमंडिया आघाडीची हुकूमशाही, केशव उपाध्ये यांची टीका

Keshav Upadhye: केवळ आपल्या सुरात सूर मिसळत नाही म्हणून देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांवरील नामवंत पत्रकारांवर बहिष्कार टाकून विरोधकांच्या घमंडिया…
Read More
Solapur LokSabha | 'सोलापुरच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवणार'

Solapur LokSabha | ‘सोलापुरच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या भाजपाला लोकसभा निवडणुकीत जनताच धडा शिकवणार’

Solapur LokSabha | नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षात देशाला अधोगतीकडे नेले आहे. मोदींनी जनतेला दिलेले एकही आश्वासन…
Read More