भारिप व भाजपच्या नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; कारंजा – मानोरा नगरपंचायतीचे २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांचाही प्रवेश 

NCP

मुंबई  – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार सुनील शेळके, आमदार डॉ. किरण लहामटे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी तसेच पक्षाचे इतर स्थानिक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आदरणीय पवारसाहेबांचे कुटुंब आहे. या  कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा असे आवाहन केले.

अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले व पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आदरणीय पवारसाहेबांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला.

यासोबतच मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरतशेठ काळोखे यांनीही हाती घड्याळ बांधले.

वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, अ.एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफानखान इनायतुल्लाखान, जाकीर शेख मोहम्मद इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अहमद रशीद अ. कादीर, जाकीर अली अब्बासअली, अ.आरीफ अ.वारिस मौलाना, सै. मुजाहीद सै. अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, मो. सोहेल अंसारी, अ. बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश झाला.

Previous Post
yashomati thakur

बचतगटातील महिलांच्या शेतमालाला जागतिक बाजारपेठ होणार आता उपलब्ध

Next Post
कोरोनाच्या अत्यंत घातक अशा ओमिक्रॉन व्हेरीएंटची भारतात एन्ट्री; २ जणांना झाला संसर्ग

कोरोनाच्या अत्यंत घातक अशा ओमिक्रॉन व्हेरीएंटची भारतात एन्ट्री; २ जणांना झाला संसर्ग

Related Posts
तुम मराठी निच हो, गंदे लोक हो... कल्याणच्या हायप्रोफाइल सोसायटीत परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला मारहाण

तुम मराठी निच हो, गंदे लोक हो… कल्याणच्या हायप्रोफाइल सोसायटीत परप्रांतीयाची मराठी कुटुंबाला मारहाण

कल्याणच्या (Kalyan News) हाय प्रोफाईल सोसायटीतील एका परप्रांतियाने मराठी कुटुंबातील लोकांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धूप…
Read More
Muralidhar Mohol | 'या' दिवशी मुरलीधर अण्णा दाखल करणार उमेदवारी अर्ज, मोदींची जाहीर सभाही होणार

Muralidhar Mohol | ‘या’ दिवशी मुरलीधर अण्णा दाखल करणार उमेदवारी अर्ज, मोदींची जाहीर सभाही होणार

यंदा प्रथमच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचा सामना कसब्याचे आमदार…
Read More
पती-पत्नी आणि मेहुणा.. एकाच कुटुंबात 3 आयपीएस आणि आयएएस, तिघेही एकाच जिल्ह्यात तैनात

पती-पत्नी आणि मेहुणा.. एकाच कुटुंबात 3 आयपीएस आणि आयएएस, तिघेही एकाच जिल्ह्यात तैनात

Pune News | आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. काही लोकांचे हे स्वप्न पूर्ण होते, तर काहींचे…
Read More