Chintu Verma | गरबा पंडालमध्ये बिगर हिंदूंना येण्यापासून रोखण्यासाठी इंदूर भाजप जिल्हाध्यक्षांनी अनोखी कल्पना मांडली आहे. जिल्हाध्यक्ष चिंटू वर्मा म्हणाले की, गरबा पंडालमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र प्यायला द्यावे. जर ती व्यक्ती हिंदू असेल तर त्याला गोमूत्र पिण्यास हरकत नसेल. कारण आजच्या जमान्यात आधार कार्ड एडिट होतात. गरब्याला येण्यासाठी लोक टिळकही लावतात. अशा परिस्थितीत पंडालमध्ये येणाऱ्या लोकांना गोमूत्र पाजल्यानंतरच प्रवेश द्यावा.
पत्रकारांनी चिंटू वर्मा यांना गरब्याला येणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत विचारले. यावर ते म्हणाले की, गरब्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. लोकांनी तिलक लावून पंडालमध्ये यावे. त्याचबरोबर पंडालमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला गोमूत्र प्यायला द्यावे. कारण गाय ही आपली माता आहे आणि आपण तिची पूजा करतो. अशा परिस्थितीत हिंदूंना गोमूत्र पिण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
चिंटू वर्मा ( Chintu Verma) म्हणाले की, गरबा हा देवीचा उत्सव आहे. आपण सर्वजण गोमूत्र वापरतो त्यामुळे प्रत्येकाने ते प्यावे. त्यात कोणाला काय अडचण आहे? आपल्या सर्व माता-भगिनी गरबा करायला येतात. पितृ पक्ष संपणार आहे. पितृ पक्ष संपताच नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. या काळात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
कसबा विधानसभा मतदारसंघात हेमंत रासने आणि धीरज घाटे यांच्या समर्थकांमध्ये पोस्टरवॉर
राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावड्यातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार | Rahul Gandhi
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच; ६४ हजार बेपत्ता भगिनी संदर्भात सरकारने खुलासा करावा | Nana Patole