चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाखाली भाजपाची प्रचारात आघाडी;  घरोघरी जाऊन भाजपा उमेदवाराचा प्रचार

कोल्हापूर  –  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Kolhapur by poll election) भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने आज प्रचारात आघाडी घेतली असून, घरोघरी जाऊन भेटीगाठीसह भाजपा उमेदवार सत्यजित कदम (satyajeet kadam) यांना मतदानासाठी आवाहन केले आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचाराचा जोर वाढत आहे. भाजपाचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह भाजपाचे सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून काम करताना दिसत आहेत. आज पाटील यांनी शिवाजी पेठेतील विविध मान्यवरांच्या घरी भेट देऊन, भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांना मतदानासह भाजपा व मोदींचे हात बळकट करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळी त्यांनी शिवाजी पेठेतील शहीद जवान अभिजीत सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन अभिजीतजींच्या स्मृतीस अभिवादन केले, तसेच सूर्यवंशी कुटुंबियांशी संवाद साधला. त्याचबरोबर ब्रम्हीभूती श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यादव यांच्या मठात जाऊन दर्शन घेतले, आणि ह. भ. प. महादेव महाराज यादव यांचे आशीर्वाद घेतले. तसेच हिंद केसरी तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित पैलवान विनोद चौगुले यांची सदिच्छा भेट घेऊन भाजपाच्या विजयासाठी आवाहन केले.

त्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव, कॉम्रेड चंद्रकांत यादव, यशवंत सहकारी बँकेचे संचालक अॅड प्रकाश देसाई, उद्योजक अभय देशपांडे, मराठा मावळा संघटनेचे आनंदराव जरग, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सरनाईक, प्रकाश सरनाईक, संग्राम जरग, विलास पाटील, यांच्या सह अनेकांच्या घरी जाऊन भाजपासाठी मतदानाचे आवाहन केले.

या सर्व भेटीवेळी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमर जत्राटे, डी. आर. पाटील, डॉ. इंद्रजीत पाटील, विकास पाटील, तानाजी गुरव, प्रताप देसाई यांच्या सह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.