‘…हे एका मराठ्याचे खुले आव्हान आहे’; भाजप आमदाराने संजय राऊत यांना ललकारले

मुंबई – राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत शिवसेनाच दादा असल्याचं म्हणत आम्ही जर तुमच्या घरात घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल; संजय राऊत यांचा फडणवीसांना इशारा घुसलो तर नागपुरात जाणं मुश्किल होईल असं म्हणत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिले आहे.

भाजपाचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहेत. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हालादेखील यावं लागणार आहे असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. बेकायदेशीरपणे ईडी ऑफिसमध्ये जाऊन कोण लोक बसत आहेत आणि ऑपरेट करत आहेत. ईडीच्या कार्यालयात इतरांना प्रवेश नाही ना? मग हे दोन-तीन लोक, कार्यालयात बसतात. ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांना आदेश देतात. काय करायचंय? कोणाला बोलवायचं? कोणाला टॉर्चर करायचं? मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतोय आणि मला काय सांगायचंय ते त्यांना माहिती आहे.दरम्यान, आता भाजपा आमदार अमित साटम यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.

ते म्हणाले, संजय राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये आपली जागा फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरिट सोमय्यांवर भेकड हल्ले करायचे. आता प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच तुमचे मानसिक संतुलन ढासळले आहे. हुल्लडबाजी ही भाजपाची संस्कृती नाही. तुमच्याच भाषेत बोलायचं म्हटलं तर एकदा प्रशासनाला बाजुला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजपा कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पाहायला या. हे एका मराठ्याचे तुम्हाला आव्हान आहे असं आव्हान साटम यांनी राऊतांना दिलं आहे.