भाजपच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधाण 

मुंबई : सातारा जिल्हा बँकेची नुकतीच निवडणूक पार पडली. त्यानंतर आता सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड होणार आहे. दरम्यान सातारा जावळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (MLA Shivendra Raje Bhosale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे.

शरद पवारांची शिवेंद्रराजे भोसले यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.या भेटीत जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाबाबत चर्चा झाल्याचं समजतं. यावेळी शरद पवार यांनी शिवेंद्रराजे यांच कौतुक केल्याचं समजतं.

‘शिवेंद्रराजे आपण बँक उत्तम चालविली आहे. अगदी भाऊसाहेब महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून आपण काम करताय, अशा शब्दांत पवारांनी शिवेंद्रराजेंचं कौतुक केलं. त्यावर बँकेत कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांना सोबत घेऊन कारभार केल्याचं शिवेंद्रराजेंनी पवारांना संगितल तसंच, अध्यक्षपद मिळावं अशी इच्छा बोलून दाखविल्याचं वृत्त एका वृत्तपत्राने दिले आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड सोमवार दि. ६ रोजी होणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीमधून नितीन पाटील यांचे नाव अग्रभागी आहे. त्यांच्यानंतर सत्यजितसिंह पाटणकर, राजेंद्र राजपुरे यांची नावे देखील चर्चेत आहेत. या मंडळींनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे अध्यक्षपदाची मागणी केली आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजे देखील पुन्हा अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याने सहकार पॅनल च्या वतीने कोणता निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता आहे.

You May Also Like