New India Co-Operative Bank Scam | न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा (New India Co-Operative Bank Scam) प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात, आर्थिक गुन्हे शाखेने विकासकाला अटक केली आहे. अटक केलेल्या विकासकाचे नाव धर्मेश पौण असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात झालेल्या १२२ कोटी रुपयांपैकी ७० कोटी रुपये धर्मेशने घेतल्याचे तपासात उघड झाले. ईओडब्ल्यूने म्हटले आहे की धर्मेशला मे आणि डिसेंबर २०२४ मध्ये १.७५ कोटी रुपये आणि जानेवारी २०२५ मध्ये मुख्य आरोपी जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्याकडून ५० लाख रुपये मिळाले. या प्रकरणात, काल पोलिसांनी दीर्घ चौकशीनंतर हितेश मेहताला अटक केली.
या प्रकरणावरुन आता शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. न्यू इंडिया बँक लुटणारे भाजपचे लोक आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
“मुंबईत न्यू इंडिया बँक लुटली त्याच्यात भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत. आता कुठे गेले हे मुलुंडचे पोपटलाल. एवढी मोठी बँक लुटली गेली, आता मुलुंडचा पोपटलाल कुठे लपला आहे? कोणत्या बिळात लपला आहे? आता का बोलत नाही?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.
“भारतीय जनता पक्षातील लोकांनी बँक लुटली म्हणून बोलत नाही का? गरिबांचा पैसा नाही. सामान्यांचा पैसा नाही, टॅक्सीवाल्यांचा पैसा आहे, जॉर्ज फर्नांडिस यांनी स्थापन केलेली बँक आहे. आता ते इकडे का जात नाहीत? ईडीला का सांगत नाहीत? आता का पत्रकार परिषद घेत नाहीत? आता का बुच बसले तोंडाला?” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
‘लव्ह जिहाद’ कायद्याला माझा विरोध | Ramdas Athawale
‘फक्त दोन तास ईडी हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील’
सुरेश धस, धनंजय मुंडे भेटीवर अजितदादांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले,…