भाजपाला फक्त निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते, अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?

भाजपाला फक्त निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते, अरबी समुद्रातील स्मारकाचे काय झाले?

Nana Patole : विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा अद्याप सुरु झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन लवकरच महाविकास आघाची बैठक आयोजित केली जाईल व त्या बैठकीत जागा वाटपाची चर्चा केली जाईल. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होईल असे दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले असून निवडणुकीत महाविकास आघाडी हाच चेहरा राहिल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी खासदार व आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाभ्रष्ट महायुती सरकारने राज्यातील आर्थिक, सामाजिक परिस्थिती बिघडवली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील महत्वाच्या जमिनी अदानीला दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवून नेले. शेतकरी संकटात आहे, भाजपाच्या राजवटीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या असून २० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकार शेतकऱ्यांचे कर्जमाफ करत नाही पण उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करते, अनिल अंबानी काय सरकारचा जावई आहे का? असा सवाल विचारून सर्वात जास्त बेरोजगारी महाराष्ट्रात आहे. कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. महायुती सरकारने महाराष्ट्राची अधोगती केली आहे. राज्यात धार्मिक तेढ निर्माण करुन राजकीय पोळी भाजण्याचे काम सुरु आहे.

भारतीय जनता पक्षानेच २०१४ पासून फेक नेरेटिव्ह पसरवले आहे पण भाजपाच्या प्रत्येक फेक नेरेटिव्हला काँग्रेस जशास तसे उत्तर देईल. भारतीय जनता पक्षाला निवडणुकीतच छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते. आता विधानसभा निवडणूक असल्याने शिवाजी महाराजांची वाघनखे आणल्याचा देखावा करत आहेत. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत हे इतिहास तज्ञ इंद्रजीत सावंत यांनी स्पष्ट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरच महापुरुषांचा अपमान भाजपाच्या नेत्यांनी केला. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी, भाजपाचे मंत्री व नेत्यांनी महापुरुषांचा सातत्याने अवमान केला हे राज्यातील जनता विसरलेली नाही. छत्रपतींचे भव्य स्मारक अरबी समुद्रात करण्याची गर्जना करुन पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन केले पण अद्याप स्मारकाची एक वीट रचली नाही. अरबी समुद्रातील शिवस्मारक कधी करणार? याचे उत्तर भाजपाने आधी द्यावे, असेही नाना पटोले म्हणाले.

सारथी, बार्टी मधून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महायुती सरकारने दोन वर्षांपासून फेलोशिप दिलेली नाही. पीएचडी करून काय दिवे लावणार काय? असा अपमान राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केला होता. हे सरकार नोकर भरतीही करत नाही, कंत्राटी भरती प्रक्रिया रद्द केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती पण सात-आठ महिन्यातच पुन्हा कंत्राटी नोकर भरती सुरु करून भाजपाप्रणित खोके सरकार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळत आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

या पत्रकार परिषदेला खा. डॉ. नामदेव किरसान, आ. सुरेश वरपुडकर, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Nana Patole | काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा स्वाभिमान राखणार, राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही

K. C. Venugopal | महाविकास आघाडी एकत्र विधानसभा निवडणूक लढणार आणि महाभ्रष्ट महायुती सरकार उखडून फेकणार

Suryakumar Yadav | सूर्यकुमार यादवला टी20 संघाचा कर्णधार बनणं पडलं महागात! वनडेतून झाला बाहेर

Total
0
Shares
Previous Post
विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, मविआ हाच चेहरा: Nana Patole

विधानसभेच्या जागा वाटपाची चर्चा राज्यपातळीवरच होणार, मविआ हाच चेहरा: Nana Patole

Next Post
विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लक्ष्य: K. C. Venugopal

विधानसभा निवडणूक जिंकणे हेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे लक्ष्य: K. C. Venugopal

Related Posts
बजरंग दल

नुपूर शर्मा यांना बजरंग दलाचा पाठींबा; देशव्यापी निदर्शने करण्याची केली घोषणा 

नवी दिल्ली- भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्माने पैगंबर मोहम्मद यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा वाद सुरु असताना आता बजरंग दलाने नुपूर…
Read More
रवी शास्त्री

रवी शास्त्रींनी भारताच्या ऑलटाइम बेस्ट प्लेइंग 11 मध्ये कोहली किंवा रोहित नव्हे, तर हा खेळाडू निवडला

भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलेल्या एका वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.  भारताच्या माजी…
Read More
शांत आणि प्रसन्न ठिकाणी सुट्टी घालवायची असल्यास अरुणाचल प्रदेशातील 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

शांत आणि प्रसन्न ठिकाणी सुट्टी घालवायची असल्यास अरुणाचल प्रदेशातील ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या

प्रत्येकाला प्रवास करायला खूप आवडतो. रोजची गर्दी आणि कामाचा वाढता ताण यामुळे अनेकदा लोक खूप अस्वस्थ होतात. अशा…
Read More