Aam Aadmi Party | चार दिवसांपूर्वी टॉमटॉम या संस्थेने जगातील ५०० शहरांचा सर्व्हे करून वाहतूककोंडी होणाऱ्या शहरांची यादी (Tomtom traffic index ) प्रसिद्ध केली व त्यात जगामध्ये पुण्याचा चौथा नंबर असल्याचे जाहीर केले. त्या पार्श्वभूमीवर आज आम आदमी पार्टीने पुण्यात साखर संकुल चौक, नतावाडी येथे ‘भाजप सत्ताधारी आणि प्रशासनाने मिळून पुण्याची जागतिक नाचक्की करून दाखवली’ असे म्हणत उपरोधिक अभिनंदनाचे आंदोलन केले.
पुणे (Pune) हे स्मार्टसिटी प्रकल्पा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतूकसेवा याविषयी सूचना सादर केल्या होत्या. परंतु आज जवळपास आठ नऊ वर्षानंतर सुद्धा पुण्यामधील परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकाधिक बिघडत चाललेली आहे. पुणेकरांचे वर्षाला सरासरी 110 तास वाहतूक कोंडीमध्ये वाया जात असल्याचे सत्य या निमित्ताने बाहेर आले आहे. पूर्वी हिंजवडी रोड सेनापती बापट रोड अशा काही ठराविक रोडवर होणारी वाहतूक कोंडी आता शहरात भागात होऊ लागली आहे. या वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी मधील सोफ्टवेअर कंपन्या इतर शहरांमध्ये निघून गेल्या आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना सायकल चालताना सतत अपघात होण्याची भीती मनात असते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरेशी नसल्यामुळे शाळकरी मुलींनाही असुरक्षित वाटते. वायू प्रदुषणाचा त्रास आता सर्वांनाच होतो आहे.
पुणे शहरांमध्ये भाजपचे आमदार असताना यापूर्वी भाजप महानगरपालिकेत सत्तेत असताना आणि आता प्रशासनामार्फत ट्रिपल इंजिन सरकार चालू असताना पुण्यातले उड्डाणपूलांचे, खड्ड्यांचे, अतिक्रमणांचे, बेशिस्त वाहतुकीचे, मेट्रोप्रवाशांच्या शेवटच्या कनेक्टिव्हिटीचे प्रश्न तसेच असून अजूनही विद्यापीठ चौकातील सिंहगड रोडवरील हडपसरमधील महत्त्वाचे ओव्हर ब्रिज पूर्ण झालेले नाहीत. तर दुसरीकडे मेट्रोमुळे, नव्या डीसी रूल प्रमाणे अधिकचा एफएसआय वापरून अधिक लोकघनतेच्या बिल्डिंग उभ्या राहणार असून त्यामुळे भविष्यात वाहतूक कोंडी अजूनच वाढणार आहे. पालिकेने तब्बल १०० कोटीची स्वयंचलित सिग्नल ATMS प्रणाली बसवूनही काही फायदा झालेला नाही.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या टिपण्णी नंतरही पुण्यातील प्रशासन सत्ताधारी भाजप आमदार आणि सरकार यांच्या या अनास्तेमुळेच दोन वर्षात जगभरात वाहतूक कोंडीमध्ये पुण्याचा नंबर सातव्या नंबर वरून चौथ्या नंबरवर गेला आहे आणि या सर्वांच्यामुळे ‘भाजपने करुन दाखवले, सुबह शाम सब जगह जाम ही जाम‘ अशा घोषणा देत आम आदमी पार्टीने अभिनंदनाचे उपरोधिक आंदोलन केले.
आजच्या आंदोलनात आम आदमी पार्टीचे (Aam Aadmi Party) मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, धनंजय बेनकर, शंकर थोरात, सुरेखा भोसले, अक्षय शिंदे, प्रशांत कांबळे, मिलिंद ओव्हाळ, सुभाष कारंडे, शेखर ढगे, कुमार घोंगडे, संजय कटारनवरे, सैद अली, संतोष काळे, सुनील सौदी, फबीयन सॅमसन, अभिजीत मोरे, अमित म्हस्के ,विकास चव्हाण, शिवाजी डोलारे, कविता गायकवाड, मनोज शेट्टी, प्रीतम कोंढाळकर, शितल कांडलकर, श्रद्धा शेट्टी, सेन्थिल अय्यर, निलेश वांजळे, अभिजीत वाघमारे, अविनाश भाकरे, सत्यवान शेवाळे, किरण कांबळे, ऋषिकेश मारणे, नौशाद अन्सारी, उमेश बागडे, शंकर पोटघन, ऋषिकेश कुंभिरकर, अजिंक्य जगदाळे, अभिजित बागडे, आप्पा वाडेकर, अजय मुनोत, अंजना वांजळे, अभिजित गायकवाड, आदी सहभागी झाले होते.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
समुपदेशनाच्या नावाखाली महिलांवर अत्याचार, डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याचे नीलम गोऱ्हेंचे निर्देश!
सैफ अली खानसोबतची घटना पुर्वनियोजित कटाचा भाग; जितेंद्र आव्हाडांचा धक्कादायक दावा
शाह बोलले अन् ‘झिरो माओवादी मिशन’ची धडाक्यात सुरूवात, 12 माओवाद्यांचा खात्मा