Pune BJP-Shinde group | ससून रुग्णालयाजवळील मंगळवार पेठेतील दोन एकर जागेचा वाद नव्या राजकीय संघर्षाचे केंद्र बनण्याची शक्यता आहे. या जागेचा खासगी विकासकाला पोटभाडेकराराने देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या काळात झाल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेवकांनी केला आहे. या व्यवहाराला स्थगिती देऊन येथे प्रस्तावित स्वतंत्र कर्करोग रुग्णालय उभारण्याची मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
विवादाच्या मुळाशी काय?
मंगळवार पेठेतील वादग्रस्त भूखंड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) एका बांधकाम व्यावसायिकाला ६० वर्षांसाठी कराराने दिला आहे. हा सुमारे ४०० कोटी रुपये किमतीचा भूखंड अवघ्या ७० कोटी रुपयांना पोटभाडेकरारावर देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
भाजपचा आक्षेप आणि मागणी
या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जागा खासगी विकासकास देण्याचा निर्णय थांबवून येथे अत्याधुनिक कर्करोग रुग्णालय स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी फडणवीस यांना पत्र लिहून हा विषय तातडीने हाताळण्याची विनंती केली आहे.
राजकीय संघर्ष तीव्र होण्याची शक्यता
या व्यवहारावर भाजप आणि शिंदे गट आमनेसामने (Pune BJP-Shinde group) आल्याने वाद अधिकच चिघळण्याची शक्यता आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून, राज्य सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.
या प्रकरणी शिंदे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाबद्दल माफी तर भाजपानेच मागावी | Atul Londhe
“बालकांचे संरक्षण आणि शिक्षणाची गुणवत्ता हा आमचा प्राधान्यक्रम” – Dada Bhuse