‘कनफ्युजन… कनफ्युजन… कनफ्युजन… ; राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांच्यातला संभ्रम दर्शविते’

पुणे : जयपूर येथे महागाई विरोधात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपच्या हिंदुत्वादाच्या मुद्यावर टीका केली. यावेळी त्यांनी मी हिंदू आहे पण हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले. भारत हा हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही, असे राहुल गांधी यांनी रविवारी सांगितले. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या तीन-चार मित्रांनी 7 वर्षात देश उद्ध्वस्त केल्याचे त्यांनी सांगितले.

गांधी म्हणाले, ‘मी हिंदुत्ववादी नाही, मी हिंदू आहे.’ येथील ‘महागाई हटाओ रॅली’ला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘हा देश हिंदूंचा देश आहे, हिंदुत्ववाद्यांचा नाही. देशात महागाई आणि वेदना होत असतील तर हिंदुत्ववाद्यांनी हे काम केले आहे. हिंदुत्ववाद्यांना कोणत्याही परिस्थितीत सत्ता हवी आहे.

यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांना फटकारले आहे. ‘राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांच्यातला संभ्रम दर्शविते. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

हे देखील पहा