महापौर पेडणेकरांच्या दालनातून टेंडरच्या फायली गायब, भाजप करणार ACBकडे तक्रार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या दालनातून फायली गायब झाल्याचा धक्कादायकप्रकार उघडकीस आलाआहे. या सर्व टेंडरच्या फायली असून त्या गायब होण्यामागे काही आर्थिक हितसंबंध आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.

भाजपने हा धक्कादायक आरोप केला आहे. मलेरिया आणि डेंग्यूवरील उपाय योजनांसाठीच्या या टेंडर फायली असल्याचं मिहीर कोटेचा यांनी म्हटलं आहे. महापौरांच्या दालनातून या फायली गायब झाल्या आहेत. 14 महिन्यात 18 वेळी रिमाइंडर देण्यात आलं आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरियाने डोकं वर काढलं आहे. तरीही या फायलींबाबतची कार्यवाही झाली नाही. एवढया वेळा रिमाइंडर देऊनही महापौरांच्या ऑफिसमधून फाईल गायब झाल्या आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दाखल करणार असल्याचं भाजपने म्हटलं आहे. या संदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिले आहे.

दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले असून ते म्हणाले,महापौर दालनातून टेंडरच्या फायली गायब झाल्या आहेत. पालिकेतील वाझे कोण? याचा शोध घेण्यासाठी भाजप एसीबीकडे तक्रार करणार आहे. टक्केवारी लपवण्यासाठी फायली गायब करायच्या आणि मग एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोटी करायची अशी टीका त्यांनी केली आहे.