Muralidhar Mohol | कोथरूडमध्ये भाजप कार्यकर्ते देवेंद्र जोग यांना गजा मारणेच्या टोळीने बेदम मारहाण केली. या घटनेवर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पुणे पोलिसांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
मोहोळ ( Muralidhar Mohol) म्हणाले, “देवेंद्र जोग माझ्या ऑफिसमध्ये काम करत नाही, पण तो भाजपमध्ये कार्यरत आहे. कोथरूडमध्ये त्जाताना त्याचा धक्का लागला म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. हे पूर्णपणे चुकीचं असून, पुण्यात अशा घटना घडता कामा नयेत.”
त्यांनी पुढे सांगितले की, “जर कोणी गुन्हेगारांना वाचवत असेल, तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पुण्यात जर पोलिसांनाही मारहाण होत असेल, तर आम्ही पुणे पोलिस आयुक्तांना सांगतो—हे चालू देणार नाही.”
या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तीन आरोपींना अटक केली असून, मुख्य आरोपी बाब्या पवार अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
ससूनजवळील मोक्याच्या जागेवरून भाजप-शिंदे गट आमनेसामने येण्याची शक्यता
अंजली दमानिया यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोट्या आरोपांचे प्रदर्शन – Dhananjay Munde