दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपाचे षडयंत्र : नाना पटोले

दंगली पेटवून महाराष्ट्र अशांत करण्याचे भाजपाचे षडयंत्र : नाना पटोले

मुंबई – त्रिपुरात घडलेल्या घटनेचे पडसाद म्हणून महाराष्ट्र अमरावती, नांदेड, मालेगावसह काही भागात वातावरण पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असून या षडयंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये शांतता राखावी, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.

काल आणि आज अमरावतीसह काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध करून नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी.

समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव आहे. महाराष्ट्रातील जनतेने भारतीय जनता पक्षाचा हा कुटील हेतू ओळखून षडयंत्राला बळी पडू नये, राज्यात शांतता राखावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले आहे.

https://youtu.be/iLGbybjU9tc

Previous Post
rahul gandhi

काँग्रेसची विचारधारा देशाला जोडणारी तर भाजपा, आरएसएसची विचारधारा द्वेष पसरवणारी – राहुल गांधी

Next Post

कंगणा राणावत विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – नसिम खान

Related Posts
पंकजा मुंडे

पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल की नाही याबाबत शंका आहे,त्यांनी आता वाट न पाहता… : खडसे

मुंबई – जवळपास 40 दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.…
Read More
nana patole

भाजपा व देवेंद्र फडणवीसच ओबीसींच्या न्याय हक्काचे मारेकरी; नाना पटोले यांचा नवा आरोप 

मुंबई –  राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील ‘ज्ञानदीप’ संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे प्रस्तावित करून कोणाचा फायदा करून दिला…
Read More
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तारिख जाहीर, खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर जागा रिक्त

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची तारिख जाहीर, खासदार वसंतराव चव्हाणांच्या मृत्यूनंतर जागा रिक्त

Nanded LokSabha By-Election | भारतीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभेची…
Read More