कसब्यातील बूथरचनेसाठी भाजपचे मायक्रो प्लॅनिंग; हेमंत रासने यांचा जाहीर प्रचार झाला सुरु

Pune – कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ शहर भाजपने बूथ यंत्रणेचे मायक्रो प्लॅनिंग आज झालेल्या नगरसेवक आणि पदाधिकारी बैठकीत केले असल्याची माहिती शहर भाजपचे अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितली

मुळीक म्हणाले, ‘कसबा विधानसभा मतदारसंघात एकूण २७० बूथकेंद्र आणि ७४ शक्तिकेंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक बूथसाठी बूथप्रमुख आणि पंचवीस सदस्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटक व संस्था-संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे.’

एका शक्तिकेंद्रात तीन ते चार बूथचा समावेश आहे. सर्व ७४ शक्तिकेंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. एक माजी नगरसेवक आणि एका शहर पदाधिकार्‍याच्या बरोबर शक्तिकेंद्र प्रमुख काम करणार आहेत.

मतदारसंघात सहा प्रभाग असून त्यांची जबाबदारी आजी-माजी आमदारांना देण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात निवडणूक व्यवस्थापनासाठी शहरातील अन्य विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मदत करणार आहेत. ती यादी पुढील प्रमाणे

प्रभाग क‘मांक १५ – सदाशिव, शनिवार, नारायण पेठ – माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, कोथरुड मतदारसंघ

प्रभाग क‘मांक १६ – कसबा पंपिंग स्टेशन – आमदार सिद्धार्थ शिरोळे, शिवाजीनगर मतदारसंघ

प्रभाग क‘मांक १७ – रास्ता पेठ – माजी आमदार योगेश टिळेकर, हडपसर मतदारसंघ

प्रभाग क‘मांक १८ – महात्मा फुले मंडई – खडकमाळ आळी – माजी आमदार बापूसाहेब पठारे, पर्वती मतदारसंघ

प्रभाग क‘मांक १९- कासेवाडी-लोहियानगर – आमदार सुनील कांबळे, कॅन्टोन्मेंट मतदारसंघ

प्रभाग क‘मांक २९ – दत्तवाडी-नवी पेठ – आमदार भीमराव तापकीर, खडकवासला मतदारसंघ

भाजपच्या या यंत्रणेला शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते लवकरच जोडले जाणार आहेत.

हेमंत रासने यांचा आजपासून जाहीर प्रचार

कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत रासने यांचा जाहीर प्रचार आज (बुधवार, दि. ८) सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे. रास्ता पेठ प्रभागातील शिवरामदादा तालीम ते किराडगल्ली परिसरात रासने पदयात्रेद्वारे मतदारांना भेटणार असून, महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.