भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध – नवाब मलिक

मुंबई – भाजपचा टिपू सुलतान यांना विरोध म्हणजे भारतीय राज्यघटनेला विरोध आहे हे स्पष्टपणे दिसते अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

भाजप टिपू सुलतान यांच्या नावाने राजकारण करत आहे. तुम्ही राज्यघटना पाहिली किंवा वाचली आहे का असा थेट सवाल नवाब मलिक यांनी भाजपला विचारला आहे.

घटनानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतील भाग – १५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज व गुरु गोविंदसिंगजी यांचे छायाचित्र व कार्याचा गौरव करणारा उल्लेख केला आहे तर भाग – १६ मध्ये राणी लक्ष्मीबाई व टिपू सुलतान यांचे छायाचित्र व त्यांच्या कार्याच्या गौरवाचा उल्लेख आहे म्हणजेच भाजप घटनेला विरोध करतेय असे स्पष्ट दिसते असेही नवाब मलिक म्हणाले.