मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्याचा संकल्प करणारी हंडी उपमुख्यमंत्र्यांनी फोडली

Mumbai – राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. दोन वर्षानंतर प्रथमच मोठ्या थाटात सर्वत्र भव्य, दिव्य अशा दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यातच आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि तरुणाईच्या तुफान जल्लोषात वरळीच्या ऐतिहासिक जांबोरी मैदानात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार संपवण्याचा संकल्प करणारी दहिहंडी मुंबई भाजपातर्फे फोडण्यात आली.

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या दहीहंडी उत्सवात विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार राजहंस सिंह, उत्तर भारतीय महाराष्ट्र अध्यक्ष संजय पांडे, संजय उपाध्याय आयोजक संतोष पांडे आदी सहभागी झाले होते