आधी आरोप करायचे नंतर पक्षात प्रवेश द्यायचा ही भाजपाची स्टाइल – Supriya Sule

आधी आरोप करायचे नंतर पक्षात प्रवेश द्यायचा ही भाजपाची स्टाइल - Supriya Sule

Supriya Sule :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर लावण्यात आलेले आरोपामधील एकही आरोप सिद्ध झालेला नाही आहे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर हे पत्र आरोप प्रत्यारोप कसे काय येते असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी विचारला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या पत्राची वेळ बघा, विधासभेच्या निवडणुका दोन महिन्यावर आल्या आहेत. इतके वर्षे गल्लीपासून दिल्लीपर्यंत यांची सत्ता आहे. गेली दहा वर्षे यांची सत्ता आहे. या गोष्टी आताच कशा काय येतात? गेली अडीच वर्षे त्यांचे सरकार महाराष्ट्रात आहे. बरोबर विधानसभेआधीच हे पत्र, आरोप-प्रत्यारोप कसे काय येतात? असे सुप्रियाताई सुळे यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, अनिल देशमुख यांच्याविरोधातील आरोप आहेत, यात एकही आरोप सिद्ध झालेला नाही. ते सगळे खोट ठरलेले आहे.१०० कोटी आरोपाचे काही झालेले नाही. त्यामुळे आता दुसऱ्या कोणाची यात नाव म्हणजे मला आता हे सगळे बालिशपणाचे वाटत आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ झाले आहे, बालिशपणाचे आरोप केले जात आहेत.आमचा पक्ष सुसंस्कृत आहे. गलिच्छ गोष्टी आम्ही कधी केल्या नाहीत. भाजपाची स्टाइल आहे ही आधी आरोप करायचे नंतर त्यांनाच आपल्या पक्षात घ्यायचे. पत्र कोणी लिहिलंय? कधी लिहिलंय? मीही उद्या पत्र लिहून आरोप करेन, असं नसतं आयुष्य खूप सिरिअप आहे. आम्ही कधीही खोटे आरोप करत नाही. आम्ही बदल करण्यासाठी राजकारणात आलो, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ या सर्व नेत्यांना त्यांनी किती त्रास दिला, ते मी पाहिलं आहे, भारतीय जनता पार्टीने ज्या १२ लोकांवर आरोप केले होते ते आज कुठे आहे. आजचे राजकारण खूप गलिच्छ झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर हे बाहेर आले आहे. निवडणुकीच्या आधी पत्र आणि नाव त्यांनी का घेतलं असाही सवाल यावेळी सुप्रिया सुळें यांनी केला आहे.

यावर सविस्तर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, धोरणे, महागाई बेरोजगारी, भ्रष्टाचार यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. आम्ही कधीच कोणावर आरोप केले नाहीत. आरोप केलेले ते शंभर कोटी कुठे आहेत. मग आरोप खोटा ठरला ना, ज्यांनी देशमुखांवर आरोप केले ते आज कुठे आहेत. असे सुप्रिया सुळें यांनी म्हटले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती आणि महाराष्ट्रात वाढणारी बेरोजगाराची परिस्थिती यावरही कोणीतरी बोललं पाहिजे. पण त्यावर कोणीही बोलत नाही. भ्रष्ट्राचार झाकण्यासाठी भाजपाचं वाशिंग मशीन आहे. आमचा पक्ष सुसंस्कृत पक्ष आहे. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालणारे लोक आहेत. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आणि समाजकारणात आलो आहोत. अशा प्रकारे कोणाचा बदला घेण्यासाठी किंवा अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण आम्ही कधी करत नाहीत आणि पुढेही कधी करणार नाही. अशा प्रकारचे आरोप आम्ही कधीही कोणावरही केले नाहीत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Total
0
Shares
Previous Post
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राज्यात सर्वच लाडके व्हायला लागले - प्रदेशाध्यक्ष Jayant Patil

लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राज्यात सर्वच लाडके व्हायला लागले – प्रदेशाध्यक्ष Jayant Patil

Next Post
Sachin Vaze is a Disgraced Person, says NCP's Mahesh Tapase

Sachin Vaze is a Disgraced Person, says NCP’s Mahesh Tapase

Related Posts
Dilip Walse-Patil

‘हनुमानाचा जन्म हा वाद अनावश्यक आहे; त्यापेक्षा महागाई, बेरोजगारीकडे लक्ष द्या…’

मुंबई – केंद्रसरकारच्या नोटाबंदीच्या (Denomination) धोरणामध्ये मोठी चूक झाली असून हे कशामुळे घडले व धोरण कुठे फसले ही…
Read More
"ही लोकं किती मुर्ख आहेत याचा प्रत्यय आला", सुनील गावसकरांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

“ही लोकं किती मुर्ख आहेत याचा प्रत्यय आला”, सुनील गावसकरांनी पाकिस्तानला सुनावले खडेबोल

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना…
Read More
महाशिवरात्रीला राशीनुसार 'हे' उपाय करा, भगवान शंकर होतील प्रसन्न; फळफळेल नशीब!

महाशिवरात्रीला राशीनुसार ‘हे’ उपाय करा, भगवान शंकर होतील प्रसन्न; फळफळेल नशीब!

पुराणात महाशिवरात्री (MahaShivratri 2023) ही भगवान शिवाची (Lord Shiva) रात्र मानली गेली आहे. या दिवशी शिवाची आराधना केल्याने…
Read More