नांदेड : भाजयुमो शहरच्या वतीने हडको येथे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन

  नांदेड – नांदेड भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल बेकाल वक्तव्य केल्या प्रकरणी हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले व भाजपा पदाधिकारी यांच्या ऊपसिथीत निषेध व्यक्त करून छायाचित्रास जोडो मारो आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बदल बेकाल वक्तव्य केल्या नंतर राज्यात तिव्र पडसाद उमटले, नांदेड शहर भाजयुमो शहर जिल्हाध्यक्ष संजय पाटील घोगरे यांच्या वतीने हडको मध्ये ५ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ वाजता निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले, अशोक पाटील धनेगावकर, भाजयुमो सरचिटणीस सुनील भालेराव पाटील,रोहीत पाटील, सिडको भाजयुमो अध्यक्ष गजानन कते,रवि भेंडे , उमेश स्वामी, गंगाधर चव्हाण,अजय जोगंदड, किरण कापसे,कृष्णा मांजरमकर,पिंटु अप्पा एकलारे,मोनु जोशी,केलास हंबर्डे,बाळु घाटे,लखन घोगरे,विशाल घोगरे, सचिन चाकुरकर, संतोष एकलारे, योगेश सोमाणी,प्रशांत कोकरे, यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडोमारून निषेध आंदोलन केले.

निषेध आंदोलन पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश कोरे व अंमलदार यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.