चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन

पुणे : महाविकास आघाडी सरकारने राज्यातील जनतेची क्रूर थट्टा चालवली आहे. अतिवृष्टी आणि चक्रीवादळामुळे नुक्रसानग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन, त्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपा प्रदेशाध्यक्षांसह प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे सर्व पदाधिकारी, पुणे शहर भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनित जोशी यांनी सहभाग घेतला.

राज्य सरकारने महापूर, चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अत्यल्प मदत देऊन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांना आपले वेतन मिळत नसल्याने, आत्महत्येचा मार्ग निवडावा लागत आहे. तसेच, याविरोधात आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दुसरीकडे राज्यातील महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच, कोविड काळात राज्य सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना घोषित केलेल्या पॅकेजचेही वाटप होत नाही आहे. त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ पुण्यात काळी फीत लावून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष सुधाकर भालेराव, प्रदेश संघटन सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, मिलिंद माने आदींनी सहभाग नोंदविला.