१४ वेळा प्रयत्न करुनही गरोदर होऊ शकली नाही ‘ही’ अभिनेत्री, अखेर सलमानच्या मदतीने बनली आई

मुंबई: बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी लग्न केले पण आजपर्यंत त्या आई होऊ शकल्या नाहीत. त्याचबरोबर काही अभिनेत्री अशा आहेत ज्या सरोगसी किंवा इतर कोणत्याही माध्यमातून माता बनल्या आहेत. चला तर मग आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत, ज्या आई होऊ शकल्या नाहीत.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

रेखा
ज्या अभिनेत्रींना लग्नानंतर आई होण्याचे सुख मिळाले नाही, त्यात पहिले नाव येते बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाचे (Rekha). रेखाचे लग्न बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी झाले होते. पण वर्षभरातच रेखावर दुःखाचा डोंगर कोसळला जेव्हा तिच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर रेखा आई होऊ शकली नाही आणि तिने दुसरे लग्नही केले नाही.

कश्मिरा शाह
चित्रपट आणि टीव्ही अभिनेत्री कश्मिरा शाह (Kashmera Shah) देखील नैसर्गिक पद्धतीने आई होऊ शकली नाही. तिने १४ वेळा गरोदर राहण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. म्हणून तिने सलमान खानच्या (Salman Khan) सल्ल्यानुसार सरोगसीचा अवलंब केला आणि त्यानंतर ती दोन मुलांची आई झाली.

शबाना आझमी
शबाना आझमी (Shabana Azmi) यांनी जावेद अख्तरशी लग्न केले पण त्यांना मूलबाळ झाले नाही. शबाना जावेद अख्तरची दुसरी पत्नी बनल्या. जावेद अख्तर यांचा पहिला विवाह हनी इराणीशी झाला होता, ज्यांच्यासोबत ते दोन मुलांचा (फरहान अख्तर आणि झोया अख्तर) पिता बनले होते. शबानाचेही या दोन मुलांवर स्वतःच्या मुलांसारखे प्रेम आहे.

सायरा बानो
सायरा बानोने (Saira Banu) १९६६ मध्ये २२  वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या दिलीप कुमार यांच्याशी लग्न केले. दोघांनी खूप प्रयत्न केले पण त्यांना मूल झाले नाही. वैद्यकीय गुंतागुंतीमुळे त्यांना मूलबाळ झाले नाही आणि दोघांनाही पालक होण्याचे सुख मिळाले नाही.

हेलन
पहिले लग्न मोडल्यानंतर हेलनने (Helen) चित्रपट लेखक सलीम खान यांच्याशी दुसरे लग्न केले. सलीम खान यांचेही हे दुसरे लग्न होते. लग्नानंतर दोघांनाही मूलबाळ न झाल्याने त्यांनी अर्पिता नावाची मुलगी दत्तक घेतली.