अक्षय कुमारची लाडकी गेलीय आई ट्विंकल खन्नावर, व्हिडिओत पाहा कशी दिसतेय नितारा

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) अनेकदा त्याच्या कोणत्या ना कोणत्या चित्रपटामुळे चर्चेत असतो. अक्षय लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वेदात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटात अक्षयने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. अक्षयने या चित्रपटाचा फर्स्ट लूकही चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अक्षयच्या कुटुंबाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. अक्षयच्या पत्नीचे नाव ट्विंकल खन्ना असून त्यांना नितारा (Nitara Kumar) आणि आरव ही दोन मुले आहेत.

अक्षयची मुलगी (Akshay Kumar Daughter) नितारा 10 वर्षांची झाली आहे. अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने अक्षय आणि त्याच्या मुलीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अक्षय निताराचा हात धरून चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, नितारा हुबेहुब तिची आई ट्विंकलसारखी दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय.

यापूर्वी अक्षयने स्वतः निताराच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो आपल्या मुलीचा हात धरून वाळवंटात फिरताना दिसत आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “माझा हात पकडण्यापासून ते आता स्वतःची शॉपिंग बॅग धरण्यापर्यंत, माझी मुलगी खूप वेगाने मोठी होत आहे. आज तिला 10 वर्षे पूर्ण होत आहेत.”

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमार याआधी रामसेतूमध्ये दिसला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाई करू शकला नाही. आता अक्षय कुमारचा हा चित्रपट 23 डिसेंबरपासून प्राइम व्हिडिओवर उपलब्ध झाला आहे.