Year Ender 2022: असे बॉलीवूड सेलिब्रिटी, ज्यांनी घेतला घटस्फोट; रजनीकांतचा जावईही यादीत

Year Ender 2022: वर्ष २०२२ संपायला अवघे काही दिवसच उरले आहेत. यावर्षी बऱ्याचशा अभिनेते व अभिनेत्रींनी लग्न केले आहे. आलिया भट्ट-रणबीर कपूरचा विवाहसोहळा हा बॉलीवूडमधील ग्रँड लग्नसोहळ्यांपैकी एक राहिला. सर्वात क्यूट कपल्स कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनीही याचवर्षी लग्न केले. ताजं उदाहरण घ्यायचं झाल्यास, तुझ्यात जीव रंगला मराठी सिरीयल फेम अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनीही लगीनगाठ बांधली.

पण एकीकडे वर्ष २०२२ मध्ये काही सेलिब्रिटिंनी लग्न केली तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी कपल्सचा घटस्फोटही झाला. यातील काही कलाकारांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर काही कलाकारांवर मारहाणीचा आरोपही करण्यात आला आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यो यो हनी सिंग
यामध्ये पहिले नाव आहे गायक यो यो हनी सिंगचे. यो यो हनी सिंगला त्याच्या विस्कटलेल्या विवाहित जीवनाची घडी बसवता आली नाही आणि त्याने पत्नी शालिनीला घटस्फोट दिला. याआधीही दोघांनी एकमेकांवर आरोप केले होते.

ऐश्वर्या आणि धनुष
दुसरे नाव रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या आणि जावई धनुष यांचे आहे. धनुषने ऐश्वर्याला घटस्फोट दिला आणि दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हिंदी चित्रपटसृष्टीशिवाय धनुष आणि ऐश्वर्या ही दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नावं आहेत. या दोघांनी 17 जानेवारी रोजी वेगळे होण्याची घोषणा केली होती. दोघेही गेल्या 18 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या प्रसंगी दोघांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट जारी केली होते. ‘आम्ही आमचे संबंध खराब न करता परस्पर सामंजस्याने वेगळे होत आहोत,’ असे ते यावेळी म्हणाले होते.

राखी सावंत आणि रितेश
बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचाही याच वर्षी घटस्फोट झाला आहे. तिने पती रितेशपासून वेगळे झाल्याची घोषणा केली होती आणि आता तिचा नवीन प्रियकर आदिलला डेट करत आहे. विशेष म्हणजे, ती बिग बॉस 15 मध्ये तिचा पती रितेशसोबत दिसली होती, जिथे तिने सांगितले की तो तिचा नवरा आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याची घोषणा केली होती.

सोहेल खान आणि सीमा सजदेह
सोहेल खाननेही त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आहे. सोहेल खानने पत्नी सीमा सजदेहला घटस्फोट दिला आहे. 24 वर्षांनंतर हे जोडपे वेगळे होत आहे. दोघांनाही २ मुले आहेत.

इम्रान खान आणि अवंतिका मलिक
आमिर खानचा पुतणा इम्रान खानन हे जोडपेही आपले वैवाहिक जीवन मागे टाकून पुढे सरसावले. दोघांनी घटस्फोट देऊन त्यांचे पती-पत्नीचे नाते संपवले.