Photo: डोळ्यांवर सूज, शरीरावर जखमा; एक्स बॉयफ्रेंडकडून अभिनेत्रीला बेदम मारहाण

मल्याळम सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अनिका विक्रमनने (Anicka Vikhraman) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून तिच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला आहे. या फोटोंमध्ये अनिकाच्या चेहऱ्यावर अनेक जखमा दिसत आहेत. तिचे डोळे सुजले आहेत आणि अभिनेत्री खूप दुखावलेली दिसत आहे.

एक्स बॉयफ्रेंडने अनिकाचे केले हाल
अनिकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्यासोबत घडलेली आपबिती सांगितली आहे. तिच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. अनिकाने सांगितले की, तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्यासोबत हे केले आहे. आपला भूतकाळ मागे सोडल्यानंतरही आपल्याला सतत धमक्या येत असल्याचेही तिने सांगितले.

मानसिक आणि शारीरिक छळ केला
अनिका म्हणाली, ‘माझ्यासोबत जे काही घडले ते मी मागे सोडले असूनही, मला सतत धमकीचे फोन येत आहेत. माझ्या कुटुंबावर चिखलफेक केली जात आहे. मी दुर्दैवाने अनूप पिल्लई नावाच्या माणसाला डेट करत होते, पण त्याने माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. एवढे करूनही तो मला धमक्या देत आहे. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की तो असे कधी करेल.’

अनेक वेळा मारहाण केली
अनिकाने खुलासा केला की तिचा माजी प्रियकर अनुप पिल्लईने तिला अनेकदा मारहाण केली. ती म्हणाला, ‘जेव्हा त्याने मला पहिल्यांदा मारले तेव्हा आम्ही चेन्नईत होतो. परंतु या कृत्यानंतर तो माझ्या पाया पडला आणि रडू लागला. त्याला क्षमा करायला मी मूर्ख होते. दुसऱ्यांदा त्याने मला बेंगळुरूमध्ये मारहाण केल्यावर मी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याने पोलिसांना पैसे दिले होते आणि त्यांनी आम्हाला आपापसात प्रकरण मिटवण्यास सांगितले. यानंतर त्याने माझ्यावर पुन्हा हल्ला करण्याचे धाडस केले.’

https://www.instagram.com/p/CpZ9q3sPYvr/?utm_source=ig_web_copy_link

कुटुंबाची बदनामी होत आहे
या घटनांना मागे टाकूनही मला सतत धमक्या येत आहेत आणि माझी आणि माझ्या कुटुंबाची सतत बदनामी केली जात आहे. अनिका म्हणाली, ‘माझ्या एक्स बॉयफ्रेंडने माझ्यावर हल्ला करण्यापूर्वी शेवटचा फोटो क्लिक केला होता.’ तसेच या घटनांनंतर आपल्याला धमक्या येत असल्याचेही तिने सांगितले. यासोबतच तिच्या कुटुंबाचीही बदनामी होत आहे.