Corbin Bosch | आयपीएल 2025 चा 45 वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू कॉर्बिन बॉशने मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. विशेष म्हणजे कॉर्बिनने पाकिस्तान सुपर लीग सोडून थेट इंडियन प्रीमियर लीगची वाट धरली आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने लखनौविरुद्ध जोरदार तयारी केली आहे.
कॉर्बिन बॉशचा (Corbin Bosch) याआधी पीएसएलमध्ये पेशावर झल्मी संघासाठी समावेश झाला होता. मात्र, आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यानंतर त्याने पीएसएलमधून माघार घेतली. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर एका वर्षाची बंदी घातली आहे. लिझार्ड विल्यम्सच्या दुखापतीनंतर मुंबई इंडियन्सने कॉर्बिनला संघात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधून टीका झाली असली तरी बॉशने माफी मागत आपल्या आयपीएल प्रवासावर लक्ष केंद्रित केलं आहे.
आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रायन रिक्लेटन, रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, नमन धीर, कॉर्बिन बॉश, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर आणि कर्ण शर्मा यांचा समावेश आहे. तर लखनऊकडून एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत, आयुष बडोनी यांसारखे खेळाडू मैदानात उतरले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
आता तरी राहुल गांधींचं डोकं ताळ्यावर येईल, चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा
राष्ट्रीय सुरक्षेसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सर्व माध्यमांना निर्देश
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासोबत उभे जागतिक नेते; एनआयएकडे तपास सोपवला