‘भोंग्यावरुन हायकोर्टाने दिलेला आदेश ज्या मशिदी पाळत नसतील त्या मशिदींचे माईक तोडा’

औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याची सभेची चर्चा आणि पडसाद अद्याप उमटत आहेत. मशिदीवरचे भोंगे हटवावेत अथवा त्यांच्यासमोर मोठ्या आवाजात मंदिरांवर मोठ्या आवाजात हनुमान चालिसा (hanuman Chalisa)  लावावी, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं होतं. यावरुन संपूर्ण महाराष्ट्रात राजकारण सुरु असताना या वादात आता करणी सेनेने (karani sena)  उडी घेतली आहे.

करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अम्मू (surajpal ammu) यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना  भोंग्यावरुन हायकोर्टाने दिलेला आदेश ज्या मशिदी पाळत नसतील त्या मशिदींचे माईक तोडा असे आदेश सूरजपाल अम्मू यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. इतकच नव्हे जर हे काम करत असताना कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई झाली तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू असंही आश्वासन सूरजपाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

यावेळी बोलत असताना सूरजपाल यांनी हिंदुत्व, लोकसंख्या नियंत्रण यासारख्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. “हिंदू जनजागरण अभियान हे आमचं उद्दीष्ट आहे. लोकसंख्या नियंत्रणावर कायदा कसा बनवता येईल याबद्दलही आम्ही जनजागृती आणि चर्चा करणार आहोत. समाजातील एका वशिष्ट गटातील लोकांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार होणं गरजेचं आहे.”