एकनाथ शिंदेंचा भुजबळांना दणका; 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार कोसळले असून भारतीय जनता पार्टी (BJP) व शिंदे गटाने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून गेली आधीच वर्षातील मागील सरकारचा कारभार पाहता या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत.

दरम्यान, राज्याला मिळालेल्या नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी कामाचा धडाका सुरु केला आहे. सोबतच आधीच्या सरकारने घेतलेले काही निर्णय देखील रद्द केले जात आहेत. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal)  दणका दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जिल्हा नियोजन समितीच्या 600 कोटींच्या कामांना ब्रेक लावला आहे.

घाई घाईत कामांना मंजुरी कशासाठी?, असा सवाल एकनाथ शिंदेंनी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला आहे. जिल्हा नियोजन कार्यसमितीची घाईघाईने बैठक घेऊन 567 कोटींचे काम मंजूर केले होते आता याच कामांना ब्रेक लावला आहे.