Breaking : चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Pune  : पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. (Breaking: Chinchwad and Kasba Assembly constituencies by-election announced)

या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने (Central Election Commission) या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, आता या दोन्ही जागांवर निवडणूक होणार की बिनविरोध निवडणूक होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.