Breaking : उद्धव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा; महाविकास आघाडीचा किल्ला ढासळला 

मुंबई  – महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याने अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी राजीनामा (Resigned) दिला आहे.  सोशल मिडीयावरून जनतेशी संवाद साधत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. अनैर्सागिक आघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा पवार-ठाकरे (Pawar – Thackeray) यांचा प्रयत्न अखेर फेल झाला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, मी शिवसेना अनुभवत आलो आहे. रिक्षावाले, टपरीवाले, हातभट्टीवाले यांना शिवसेना प्रमुखांनी चांगल्या मार्गावर आणलं. माणसं मोठी झाली आणि मोठी झाल्यानंतर ज्यांनी आपल्याला मोठं केलं, त्यांनाच विसरायला लागली. ज्यांना आजपर्यंत मोठं केलं, सत्ता आपल्याकडे आल्यानंतर जे देता येणं शक्य होतं ते सगळं दिलं, ती लोकं नाराज झालो म्हणायला लागली.

मातोश्रीला (Matoshree) सातत्याने लोक येत आहेत. साधी माणसं येत आहेत. काळजी करू नका म्हणत आहेत. ज्यांना दिलं ते नाराज, ज्यांना नाही दिलं, ते हिंमतीनं सोबत आहेत. याला म्हणतात माणुसकी. याच नात्याच्या जोरावर शिवसेना आजपर्यंत मजबूत उभी राहिली आहे.असं ते म्हणाले.