Prakash Ambedkar | सत्ता ही भाजपची असो किंवा काॅंग्रसेची असो सगळ्यांचा डोळा झोपडपट्टी खालच्या जमिनीवर आहे. पण, कोणालाही वाटत नाही, झोपडपट्टीतल्या माणसाला नवीन घर देताना ब्रिटीशांचे धोरण आपण बदलले पाहिजे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार संतोष अंबुलगे (Santosh Ambulge) यांच्या प्रचारार्थ मुंबईत आयोजित सभेत ते बोलत होते.
आंबेडकर म्हणाले की, ब्रिटीशांनी गिरणी, कारखाने उभे केले तेव्हा त्यांना मजुरांची गरज होती, तेव्हा त्यांनी मजुरांना राहण्यासाठी चाळी बांधल्या. आपण चाळी बांधलेल्या पाहिल्या आहेत, पण त्या राहण्या योग्य नाहीत. ब्रिटीश निघून गेलेत आता आपण स्वत: राज्य करत आहोत. पण, तरीही झोपडपट्टीतल्या माणसांना मानाने जगता यावे, यासाठी शासनाकडे आंदोलन करण्यात आले. तसेच, त्यांना मानाने जगता यावे, यासाठी किमान ५०० चौरस फुटाचे घर द्यावे, अशी मागणी करण्यात आली असून वंचित बहुजन आघाडीने तशी भूमिका मांडली आहे.
हे घर बांधत असताना तुम्ही खासगी कंपन्यांना कंत्राट कशासाठी देता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. म्हाडाकडे तुम्ही घर बाधांयला दिले. तर नागरिकांना शाश्वती असते की, आम्ही सरकार विरोधात लढू शकतो आणि पाहिजे ते मिळवू शकतो. गेल्या काही वर्षापासून आमचा लढा सुरु आहे, तो हा अमुक एका बिल्डरने गेल्या दोन वर्षाचे भाडेच दिले नाही, अमुक बिल्डरने कामच सुरू केले नाही, त्याविरोधातला हा लढा आहे. हा लढा जर कायमचा संपवायचा, असेल तर संतोष अंबुलगे यांना मतदान करुन निवडून दिले पाहिजे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :