भावा अभिमान आहे तुझा, निवृत्त कर्नलसाठी स्विगी बॉय ठरला देवदूत

आपण अनेकदा अनेक शॉर्ट फिल्म् पाहत असतो. या लघुचित्रपटात दाखवतात की सीमेवर जे सैनिक लढत आहेत, त्यांना नेहमी आदर द्या, त्यांना शक्य असेल तितकी मदत करा पण अनेकदा असं होत नाही. त्यामुळे सहज अनेकजण म्हणतात माणुसकी संपत चालली आहे. त्यांची अनेक उदाहरणे देखील समोर येतात पण काही उदाहरणे मात्र माणुसकी जीवंत आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध करतात. अशी उदाहरण समोर आली की समोर आली की पुन्हा नवीन उर्मी मिळते.

मुंबईच्या भयंकर ट्राफिकमध्ये माणुसकीचे दर्शन घडविणारी अशीच एक घटना समोर आली आहे. 25 डिसेंबरचा दिवस होता, कर्नल मालिक यांची प्रकृती अचानक बिघडली आणि अचानक ते सीरियस झाले. कर्नल मालिक यांचा मोहन मालिक त्यांना घेऊन कारने हॉस्पिटल निघाला. पण रस्त्यांमध्ये प्रचंड ट्राफिक होते. गाड्या अगदी मुंगीच्या गतीने हालत होत्या. कर्नल मालिक यांना मात्र तातडीच्या उपचारांची गरज होती, त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना शेवटी दुचाकीवर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचे ठरविले. तो कारमधून उतरून दुचाकी चालकांना मदत मागू लागला, पण त्याला मदत मिळत नव्हती. त्यावेळी मृणाल जो स्विगीमध्ये डिलेवव्हरी बॉय म्हणून काम करतो.

तो त्यावेळी ऑर्डर पोहच करण्यासाठी निघाला. कर्नल मोहन यांना मृणाला पाहिले आणि कर्नल मोहन यांना तातडीने दुचाकीवर घेतले आणि रस्त्यावरील ट्राफिकला हटविण्यासाठी तो जोरजोरात ओरडू लागला. कर्नल मोहन यांना लिलावतीत अॅडमिट केले. त्यांच्यावर तातडीने उपचार झाले. तब्बल एक महिन्यानंतर कर्नल मोहन हॉस्पिटलमधून बाहेर आले. बाहेर आल्या बरोबर त्यांनी पोस्ट करत मृणालचे आभार मानले. कर्नल मोहन म्हणतात मृणाल माझ्यासाठी तारणहार ठरला आहे.