Budget 2023 : अर्थसंकल्पानंतर जाणून घ्या काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार 

Budget 2023 Live Updates : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कपात ही सर्वात मोठी घोषणा आहे. सरकारने जुनी करप्रणाली रद्द केली. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी कोणत्या वस्तू स्वस्त केल्या जात आहेत आणि कोणत्या वस्तू महाग होत आहेत हे देखील सांगितले आहे. जाणून घेऊया कोणत्या वस्तू स्वस्त होतील आणि कोणत्या वस्तूंवर जास्त पैसे मोजावे लागतील.

मोबाईल फोन आणि कॅमेरा लेन्स स्वस्त होतील. परदेशातून येणारी चांदी स्वस्त होईल. एलईडी टीव्ही आणि बायोगॅसशी संबंधित गोष्टी स्वस्त होतील. काही टीव्ही घटकांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक कार, खेळणी आणि सायकल स्वस्त होतील. हीट कॉइलवर कस्टम ड्युटी कमी केली

सिगारेटवरील कस्टम ड्युटी वाढवण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. सिगारेट महागणार, शुल्क १६ टक्क्यांवर जाणार आहे. कापड आणि कृषी व्यतिरिक्त इतर वस्तूंवरील मूलभूत सीमाशुल्क दरांची संख्या 21% वरून 13% पर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे खेळणी, सायकल, मोटारगाड्यांसह काही गोष्टी स्वस्त होणार आहेत. दुसऱ्या बाजूला सोने-चांदी आणि प्लॅटिनम महाग होतील.