Budget 2023 : कृषी स्टार्टअपसाठी स्वतंत्र निधीची तरतूद -सीतारमण 

Budget 2023 India Live Updates :  देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2023) सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा पाचवा अर्थसंकल्प होता. पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प  होता.

त्या म्हणाल्या की, सबका प्रयास, सबका विकास अंतर्गत शेतकरी, महिला, एस-एसीटी, वंचितांना प्राधान्य देण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी डिजिटल शेतीला चालना देण्यात आली आहे. या अंतर्गत अनेक प्रकारची मदत देण्यात आली आहे. या अंतर्गत कृषी तंत्रज्ञान उद्योग आणि स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यात आला आहे. कृषी स्टार्टअपसाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे.

निर्मला सीतारामन यांनी संसदेत सांगितले की, देशभरातील एमएसएमईंना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी सरकारी-खाजगी भागीदारी आणि सरकारी कार्यक्रमांना मिशन मोडमध्ये पाठिंबा देण्यात आला. हरित ऊर्जेचा वापर वाढवण्यावर सरकार भर देत आहे. ग्रीन हायड्रोजन या योजनेत आणण्यात आले आहे.