Budget 2024 Live Updates : देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक यशांची गणना केली आहे.
आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, देशातील तरुणांसाठी हा सुवर्णकाळ असेल. ५० वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी १ लाख कोटींचं नियोजन करण्यात आलं आहे.हवाई वाहतूक क्षेत्रासाठी १ हजार नवीन विमानांची तरतूद करण्यात आली असून ५०० हून अधिक नव्या हवाई मार्गांचे प्रस्ताव विचाराधीन आहेत.
केंद्र सरकार गव्हर्नन्स, डेव्हलपमेंट आणि परफॉर्मन्स, अर्थात GDP वर समान भर देत आहे. घरांवरील सोलर पॅनल्सच्या मदतीने येत्या काळीत १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावेळी सोडलेला ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कार्यवाही केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी; मेळाव्यांचा लावला धडाका
महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती