औरंगाबाद व उस्मानाबाद येथील बसस्थानकाला अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व धाराशिव नाव

तुळजापूर – महाराष्ट्रातील औरंगाबाद (Aurangabad) व उस्मानाबाद (Osmanabad) येथील बसस्थानकाला अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhajinagar) व धाराशिव (Dharashiv) असे नाव देणे बाबतीत परिपञक महाराष्ट्र राज्य परिवहनमहामंडळ यांनी काढला असून याची तातडीने अमंलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या संदर्भित पत्रातील अधिसुचनेनुसार मध्यवर्ती बसस्थानक औरंगाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर’ असे देण्याचा, व मध्यवर्ती बसस्थानक उस्मानाबादचे नाव ‘मध्यवर्ती बसस्थानक धाराशिव’ असे देण्याचा निर्णय रा.प. महामंडळाने घेतला आहे. उपरोक्त नावाप्रमाणे जेथे जेथे औरंगाबाद असे नाव असेल तेथे तेथे छत्रपती संभाजीनगर हे नाव देण्यात यावे. याप्रमाणेच जेथे जेथे उस्मानाबाद हे नाव असेल तेथे तेथे धाराशिव हे नाव देण्यात यावे.

उपरोक्त कार्यवाही पुढिल २४ तासांत पुर्ण करण्यात यावी व अनुपालन अहवाल तातडीने जनसंपर्क शाखेस कळविण्यात यावे असे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी आदेश केले आहेत. याचा प्रती सर्व विभाग नियञकांना देण्यात आले आहेत.