धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान?

धीरेंद्र शास्त्रीच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन भाजपा सरकारकडून वारकरी संप्रदायाचा अपमान?

मुंबई –  जगतगुरु संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj) व वारकरी चळवळ ही महाराष्ट्राला लाभलेली मोठी परंपरा आहे. थोर साधु संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात आज संतांचा अपमान करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला खुलेआम परवानगी दिली जाते. बागेश्वर धामच्या भोंदू बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊन राज्यातील भाजपाप्रणित सरकारने संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाचा अपमान केला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, ज्या धीरेंद्र शास्त्रीने (Dhirendra Shastri) जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा अपमान केला त्यावर राज्य सरकार कुठलीच कारवाई करत नाही उलट मीरा रोड येथील दोन दिवसाच्या कार्यक्रमाला परवानगी देते. काँग्रेस पक्षाने या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केली होती. काही संघटनांनी सुध्दा या कार्यक्रमाला विरोध केला आहे, असे असतानाही भाजपाप्रणित सरकार या कार्यक्रमाला परवानगी देऊन ते मनुवादी आहेत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

वारकरी संप्रदायाने कधीही जातपात पाहिली नाही. जगतगुरु संत तुकाराम महाराज व वारकरी संप्रदायाला माननाऱ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिले आहे की भाजपा वारकरीविरोधी आहे. जातीपातीच्यावर जाणून एकमेकांना माऊली म्हणणारा वारकरी संप्रदाय भाजपाला नको आहे, असे संत, महापुरुष भाजपाला नको आहेत. त्यांना मनुवाद करणारे, जातीभेद करणारे, धर्मावरून तेढ निर्माण करणारे बागेश्वर धामच्या भोंदूबाबासारखे लोक त्यांना हवे आहेत.

Previous Post
समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा- पाटील

समान पाणीपुरवठा योजनेचे काम जलदगतीने पूर्ण करा- पाटील

Next Post
CM Eknath Shinde

पुणे महानगरपालिकेत समाविष्ट 34 गावांच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही – शिंदे

Related Posts
Sharad Ponkshe-vishwambhar chaudhari

यांची मुलं जातील अमेरिकेला, तुमची मुलं दहशतवादी बनतील, बहुजनांनो सांभाळून रहा!  

पुणे – सावरकर (Savarkar) नावाची दहशत वाढली पाहिजे, सावरकरप्रेमी आलाय म्हटल्यावर घाबरले पाहिजेत, आता यापुढे चित्र बदललं पाहिजे.…
Read More
चित्रपटातून उलगडणार रामदास स्वामींची गाथा, 'रघुवीर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

चित्रपटातून उलगडणार रामदास स्वामींची गाथा, ‘रघुवीर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Pune- आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. या महाराष्ट्रात अनेक थोर संतांपैकी एक संत म्हणजे “समर्थ रामदास…
Read More
हे बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं, भाजप-शिवसेनेची भूमिका काय? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

हे बाळासाहेबांना कदापिही पटलं नसतं, भाजप-शिवसेनेची भूमिका काय? INDvsPAK सामन्यावरुन मनसेचा सवाल

आयसीसीने क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे वेळापत्रक (ICC ODI World Cup 2023 Schedule) जाहीर केले आहे. या स्पर्धेला…
Read More