जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय रद्द, शिंदे- फडणवीसांची तिरकी चाल 

मुंबई : माजी मंत्री  जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी घेतलेले सर्व शासन निर्णय (Government Decisions) रद्द करण्यात आले आहेत. आता गृहनिर्माण क्षेत्राशी संबंधित सर्व निर्णय घेण्याचे अधिकार पुन्हा एकदा म्हाडा आणि विभागीय मंडळांना देण्यात आले आहेत. आव्हाड यांच्या काळातील सर्व शासन निर्णय रद्द करत शिंदे-फडणवीस सरकारने (Shinde-Fadnavis Government) एकप्रकारे जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिला आहे.

शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे आता म्हाडाला यापुढे कोणताही निर्णय घेताना सरकारवर अवलंबून राहावं लागण्याची गरज उरणार नाही. आव्हाडांनी घेतलेल्या निर्णयामुळे म्हाडाला सरकारकडून हिरवा कंदील येण्याची आधी वाट पाहावी लागत होती. मविआच्या काळात आव्हाड यांनी अनेक निर्णय घेताना म्हाडा बाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यांनी म्हाडाचे सगळे अधिकार काढून घेत ते सरकारकडे ठेवले होते. त्यामुळे म्हाडाचं काम हे फक्त प्रस्ताव तयार करणं आणि ते सरकार दरबारी पाठवणं इतकीच मर्यादित राहिली होती.