स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा; चंद्रकांतदादा पाटील यांची मागणी

चंद्रकांत पाटील

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयामुळे गंभीर पेच निर्माण होणार असून आयोगाने ओबीसींच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत सर्वच जागांवरील निवडणूक रद्द केली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे की, ओबीसींच्या आरक्षित जागा वगळून अन्य जागांवरील निवडणूक घेता येईल. पण न्यायालयाने ही निवडणूक घेतलीच पाहिजे असे काही म्हटलेले नाही. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या २७ टक्के जागा वगळून ऊर्वरित ७३ टक्के जागांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेऊ नये. अशा निर्णयामुळे केवळ सामाजिकच नाही तर गंभीर राजकीय पेच निर्माण होत आहे. आयोगाने सर्वच निवडणूक प्रक्रिया रद्द करावी.

त्यांनी सांगितले की, एखाद्या नगरपंचायतीमधील एकूण १७ जागांपैकी ओबीसी आरक्षित पाच जागांची निवडणूक वगळून ऊर्वरित १२ जागांची निवडणूक घेतली तर त्या बारा नगरसेवकांकडूनच नगराध्यक्ष निवडला जाईल. अर्थात शहरातील पाच वॉर्डातील मतदारांना त्यामध्ये काहीच भूमिका असणार नाही. एकूण सदस्य संख्येच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी सदस्य उपलब्ध असल्यास अशा प्रकारे नगराध्यक्ष किंवा त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रमुख निवडण्यास कितपत कायदेशीर वैधता राहील याबाबतही शंका आहे.

ओबीसींच्या जागा वगळून निवडणूक घेतली तर ओबीसी आरक्षणाचा निर्णय होऊन त्या जागांवर कधी निवडणूक होणार याबद्दलही अनिश्चितता आहे. एकूण या बाबी ध्यानात घेता निवडणूक आयोगाने राज्यात सध्या चालू असलेली सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, असेही ते म्हणाले.

Previous Post
nitin राऊत

‘युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वेठीला; ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा द्यावा’

Next Post
पुरी

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून होणार चौकशी – हरदीपसिंग पुरी 

Related Posts
kirit somayya

देशमुख, मलिक यांच्यानंतर आता कुणाचा नंबर? ; सोमय्यांनी घेतलं आता ‘या’ मंत्र्याचे नाव 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.अंडरवर्ल्ड…
Read More
Oscars 2023: RRR ने ऑस्करमध्ये इतिहास रचला, ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार

Oscars 2023: RRR ने ऑस्करमध्ये इतिहास रचला, ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार

Oscars 2023: एस. एस. राजामौली दिग्दर्शित RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात इतिहास रचला…
Read More

महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर! चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे – महिला सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर असून, त्यासाठी अनेक उपक्रम राबविले असल्याचे प्रतिपादन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज…
Read More